Monday, October 3, 2011

"शब्द"



काळात हरवलेल्या स्वप्नांना पुन्हा पंख देतात हे शब्द, 
स्वत: च्याच जगण्याला जगण्यापलीकडचा अर्थ देतात हे शब्द.   

बोचणाऱ्या आठवणींमध्ये रंग भरतात हे शब्द,
मग पानावलेल्या त्या डोळ्यांना वाट करून देतात हे शब्द. 

अवतरलेल्या परिस्थितीची जाणीव करून देतात हे शब्द,
विखुरलेल्या त्या स्वतःला मग प्रेमाने जवळ घेतात हे शब्द.

ध्वनीतरंग होऊन कायम सोबत राहतात हे शब्द,
मग स्वतःच्याच अस्तित्वाची सतत जाणीव करून देत राहतात हे शब्द.

वनवनत्या मनाला पानवठ्याकडे घेऊन जातात हे शब्द,
भावनांच्या या पोरखेळामध्ये  मग विसावा देतात हेच ते शब्द.   

ओसरून गेलेल्या नात्यांना पुन्हा ओलावा देतात हे शब्द,
प्रेमाच्या त्या गारव्याची पुन्हा जाणीव करून देतात हे शब्द.

विचारांना खोलवर रुजवतात हे शब्द,
त्यांचाच आघात घेऊन मनाच्या जगण्याला पूर्णविराम पण देतात देच ते शब्द.



     

Sunday, December 19, 2010

"अशी ती.."

प्रेमाच्या परिभाषेमध्ये मी आज तिझाच होऊ पहातो
तिझ्याकडून तिझे क्षण मी अलगत झेलू पहातो..

तिझ्याच विचारात मी गुंतत जातो

तिझ्या  अजान तत्वांमध्ये, मीही अजान होऊन जातो..


शब्दांच्या पारखतेला शब्दांनीच ओढ देतो

त्या प्रेमाच्या ओलाव्याला मग मीच माझा दुजवरा देतो..

तिलाच मिळवूनी, मी स्वछंदी होऊ पहातो

पण तिझ्याच अस्तित्वासाठी , पुन्हा तिझ्यातच घुटमळत राहतो..

अवतरणाऱ्या परिस्थितीसमोर मी हेलकावे खात राहतो

आम्हा दोघांचे स्वप्न मग मी एकटाच रंगवू पहातो..

दाटलेल्या भावनांना मीच माझा सावरून घेतो

ओसरून गेलेल्या त्या आठवणींमध्ये मी पुन्हा,

ओला चिंब होऊन भिजत राहतो..

Friday, December 17, 2010

"सावरुनी स्वताला का पुन्हा जगता न यावे.."

सावरुनी स्वताला का पुन्हा जगता न यावे
येणाऱ्या क्षणांना का थांबवता न यावे..

पुन्हा आईच्या कुशीत जाऊन का रडता न यावे

मोठ्यांच्या या दुनियेमध्ये का स्वछंदी होऊन बागडता न यावे..

येणाऱ्या परिस्थितीसमोर का वाकता न यावे

स्वताच्या मानसिकतेला का गोठवून ठेवता न यावे..

भूतकाळातून स्वताला का परका म्हणून पाहता न यावे

स्वताच्याच भावनांमध्ये स्वताला का झोकून देता न यावे..

एकटा पडलेल्या त्या स्वताला का समजावता न यावे

विखुरलेल्या त्या स्वप्नांना का पुन्हा वेचता न यावे..

नेहमीची पाऊलवाट विसरून का भटकता न यावे

सावरुनी स्वताला का पुन्हा जगता न यावे..

Thursday, December 16, 2010

एक कविता

विरंगुळा म्हणून वाच..
वेळ जातो म्हणून वाच..
भावानेपोटी वाच ..
पण वाच माझी एक कविता..


स्वताच्या बालपणाला आठवून वाच..
शाळेतल्या तुझ्या बाकावर बसून वाच..
आईच्या त्या नाजूक स्पर्शाला आठवून वाच..
पण वाच माझी एक कविता..


निळ्याशार समुद्रकिनाऱ्या जवळ बसून वाच..
त्या अनंत आसमंताकडे डोळे रोखून वाच..
हिरव्यागार झाडाची सावली होऊन वाच..
पण वाच माझी एक कविता..


देहभान विसरून वाच..
आठवणीच्या वेदना घेऊन वाच..
तळपणाऱ्या आकांशांकडे एकटक पाहत वाच..
पण वाच माझी एक कविता..


फाटलेल्या पतंगाला उडताना बघत वाच..
स्वताच्याच स्वप्नामध्ये स्वतालाच रडताना पाहून वाच..
डगमगणाऱ्या पायांवर तोल सांभाळत वाच..
पण वाच माझी एक कविता..


छप्पर नसलेल्या घरात बसून वाच..
तिथल्या लवलवणाऱ्या दिव्या खाली बसून वाच..
बुजलेल्या त्या पायवाटेवरून चालत जाताना वाच..
पण वाच माझी एक कविता..